ऑनलाईन टीम/तरुण भारत
जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) भारत बायोटेकची कोरोना लस कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पुरवठा संयुक्त राष्ट्र संस्थांच्या वतीने स्थगित करण्यात आला आहे. ही लस जी कोवॅक्स सुविधेद्वारे गरीब देशांना दिली जाते. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (जीएमपी) म्हणजेच चांगल्या उत्पादन पद्धतीच्या अभावामुळे आणि काही त्रुटी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, WHO ने भारत बायोटेकची कोरोना लस कोव्हॅक्सिन च्या पुरवठ्यावर बंदी घातली आहे. WHO ला निरीक्षणात आढळलेल्या उणीवा दूर करणे आणि सुविधा अपग्रेड करण्याच्या उद्देशाने कोवॅक्सीन ही भारतातील पहिली स्वदेशी कोरोना लस आहे. ही लस बनवणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने एक दिवस आधी घोषणा केली होती की ते लसीचे उत्पादन कमी करणार आहेत.
मात्र निर्यातीसाठी उत्पादन स्थगित केल्यामुळे कोव्हॅक्सिनचा पुरवठा बाधित होईल. हे निलंबन १४ ते २२ मार्चपर्यंत डब्ल्यूएचओ पोस्ट इमर्जन्सी यूज लिस्टिंग (ईयूएल) निरीक्षणाच्या परिणामांच्या प्रत्युत्तर दाखल आहे. लस निर्माता भारत बायोटेकने निर्यातीसाठी कोव्हॅक्सिनचे उत्पादन स्थगित करण्याचे संकेत दिले आहे.
दरम्यान, WHO ने 2 एप्रिल रोजी या घोषणेबाबत एक निवेदन जारी केले. यामध्ये, WHO ने म्हटले आहे की, लस घेणारे देश या लसीविरुद्ध योग्य कारवाई करू शकतात. कोवॅक्सीन पुरवठा बांध करण्याची घोषणा EUL तपासणीनंतर केली आहे. यासाठी WHO टीमने 14 मार्च ते 22 मार्च 2022 दरम्यान भारत बायोटेकच्या प्लांटची पाहणी केली होती. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर रोजी WHO ने कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली. मात्र, लसीमध्ये जीएमपीची कमतरता काय आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही.