ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाने दुसऱ्या लाटेत अक्षरशः हाहाकार माजविला आहे. तर काही तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर विषाणू संक्रमणाचा धोका असल्याचेही वैद्यकीय क्षेत्राकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणी करण्याची शिफारस तज्ञ समितीने केली होती.
दरम्यान ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने कोवॅक्सिनच्या फेज II / III च्या क्लिनिकल चाचणीस गुरुवारी मान्यता दिली. भारत बायोटेक 525 निरोगी स्वयंसेवकांवर चाचण्या घेणार आहे.
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, पाटण्यातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूरची ‘मेडीट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या संस्थांमध्ये 525 मुलांवर या चाचण्या करण्यात येणार आहेत. दरम्यान, केेेंदन औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकच्या लसीच्या चाचण्या मुलांवर करण्याबाबत चर्चा केली होती.