बंदला पाठींबा देण्यासाठी किसान आंदोलन संयुक्त समर्थन संयुक्त समिती गठीत
प्रतिनिधी/ सातारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांसाठी केलेले तीन कायदे लोकसभेत पारीत करण्यात आले आहेत. त्या कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब, हरियाणा येथील शेतकऱयांनी 11 व्या दिवशीही आंदोलन सुरुच ठेवले आहे. पंजाबच्या अकालीदल पुरस्कृत शेतकऱयांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सातारा जिह्यातील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार आहे. तसेच या बंदमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी साताऱयातील डाव्या विचारांच्या संघटनांनी एकत्र येवून किसान आंदोलन संयुक्त समर्थन मंच स्थापन केला आहे. तो मंचही या बंदमध्ये सहभागी होणार आहे. बाजार समित्यांना तर उलट बरेच झाले असून त्यांनीही तर स्वयंमस्फुर्तीने बंदमध्ये सहभाग नोंदवण्यात येणार असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांच्या फायद्याकरता तीन कायदे लोकसभेत, राज्यसभेत मांडून बहुमताने मंजूर केले. परंतु त्याच तीन कायद्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, अकालीदल यांच्यासह घटक पक्षांनी विरोध केला. कायदे झालेले असताना ते शेतकरी विरोधाचे आहेत असा ठपका ठेवून पंजाब, हरियाणा येथील अकालीदल प्रणित शेतकऱयांनी दिल्लीवर मोर्चा काढला. आज अकरावा दिवस आहे. त्यांनी पुकारलेला भारत बंदचे आंदोलन उद्या आहे. त्या आंदोलनात सातारा जिह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस उतरणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी जाहीर केले आहे. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी यापूर्वीच आंदोंलन केले होते.
दरम्यान, शिवसेनेचा पाठींबा असला तरीही शिवसेनेच्या तिन्ही जिल्हा प्रमुखापैकी एकाही जिल्हा प्रमुखांने जाहीर केले नाही. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी पाठींबा दशर्वला आहे. तसेच साताऱयात डाव्या विचारांच्या कार्याकर्त्यानी या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी किसान आंदोलन संयुक्त समर्थन मंच स्थापन केला आहे. त्यात अ.भा.स.अ.सभेचे अध्यक्ष शिवाजी राऊत, शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर, लाल निशाण पक्षाचे विजय निकम, प्रा. विक्रांत पवार, सचिन मोरे, वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत खंडाईत, प्रा. डी. डी. जाधव, सर्व श्रमिक महासंघ शंकर पाटील , संदिप कांबळे, निलेश लाड, शिक्षक हितकारणी संघटनेचे प्रा. सुनिल गायकवाड, भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बोतालजी, श्रीरंग वाघमारे मच्छिंद्रनाथ जाधव यांचा समावेश आहे.
बाजार समित्या स्वतःहून बंद ठेवणार
बाजार समितीकरता हे तीन कायदे धोक्याचे असल्याने जिह्यातील 11 बाजार समितीचा कारभार उद्या बंद राहणार आहे. साताऱयातील बाजार समिती स्वतःहून कार्यालय बंद ठेवून संपात सहभाग घेणार आहे, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.
भाजपासह सर्वसामान्य शेतकरी नाही होणार सहभागी
उद्या अकालीदल पुरस्कृत शेतकऱयांनी पुकारलेल्या भारत बंदच्या दुसरी बाजू सोशल मीडियावर भाजपाकडून व्यक्त केली जात असून या संपात सहभागी होवू नका, असे आवाहन केले जात आहे. त्यामुळे भाजपा आणि सर्वसामान्य शेतकरी या बंदमध्ये सहभागी होणार नाही. शेतकरी शेतात काम करणार आहे.