वृत्तसंस्था/ क्विन्सटाऊन
कर्णधार हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱयावर आहे. आयसीसीच्या आगामी महिलांच्या वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय महिला संघाचा हा दौरा आयोजित केला आहे. या दौऱयात पाच सामन्यांची वनडे मालिका तसेच एकमेव टी-20 सामना खेळविला जाणार आहे. भारत-न्यूझीलंड महिला संघातील एकमेव टी-20 सामन्याला येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे 5.30 वाजता प्रारंभ होईल. कोरोना महामारी समस्येमुळे हा सामना प्रेक्षकविना खेळविला जाईल.
उभय संघातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला 12 फेब्रुवारीपासून प्रारंभ होईल. न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय संघ ख्राईस्टचर्चमध्ये 10 दिवसांसाठी क्वॉरंटाईन होता. भारतीय महिला वनडे संघाची कर्णधार मिताली राज बुधवारच्या सामन्यात खेळणार नाही. न्यूझीलंड संघाचे नेतृत्व सोफी डीव्हाईनकडे सोपविण्यात आले आहे.
भारतीय महिला संघ- हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यष्टीका भाटिया, दिप्ती शर्मा, रिचा घोष, स्नेह राणा, पुजा वस्त्रकार, मेघना सिंग, रेणुका सिंग, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, एकता भिस्त, सिमरन बहाद्दूर आणि एस. मेघना.









