वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील विश्व-गट 1 मध्ये भारत आणि डेन्मार्क यांच्यातील लढत 4-5 मार्च 2022 साली भारतामध्ये होणार आहे. या लढतीचे यजमानपद भारत भूषवित आहे.
2019 नंतर पहिल्यांदाच भारतीय भूमीवर डेव्हिस चषक लढत पुढीलवर्षी होणार आहे. 2021 साली भारताने या लढतीसाठी फिनलँडचा प्रवास केला होता. 2020 साली भारत-क्रोएशिया लढत क्रोएशियामध्ये त्याचप्रमाणे 2019 साली भारत- कझाकस्तान तसेच भारत-पाक लढती भारताबाहेर झाल्या होत्या. 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात कोलकाता येथे भारत आणि इटली यांच्यातील डेव्हिस चषक लढत झाली होती आणि त्या लढतीत इटलीने भारताचा 3-1 असा पराभव केला होता. भारत आणि डेन्मार्क यांच्यात डेव्हिस चषक स्पर्धेतील ही लढत 1984 नंतर पहिल्यांदाच होत आहे. 1984 च्या लढतीमध्ये भारताने डेन्मार्कचा 3-2 असा पराभव केला होता.









