ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमारेषा वादावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्याचा दावा भारताने आज फेटाळून लावला.
मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नाही. या दोघांमध्ये यापूर्वी 4 एप्रिल रोजी हायड्रोक्लोरोक्वीन गोळ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती. यानंतर या दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी वाईट हाऊस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, गुरुवारी मी फोनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो. यावेळी भारत – चीन सीमावादावरून आमच्या चर्चा झाली असल्याचा दावा त्यांनी केला होता. नववी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चीन सोबत सुरू असलेल्या वादामुळे चांगल्या मूडमध्ये नसल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले होते.
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. तसेच या दोन्ही देशांची लोकसंख्या 1.4 अब्ज आहे. दोन्ही देशांचे लष्कर ही शक्तिशाली आहे. भारत या संपूर्ण प्रकारावरून नाराज आहे. तसचं चीन देखील खुश नाही आहे. मी पंतप्रधान मोदींची चर्चा केली आहे. चीन आज सुरू असलेल्या वादामुळे चांगल्या मूडमध्ये नाहीत, असा दावा केला होता.
परंतु गेल्या दोन महिन्यात मोदी आणि ट्रम्प यांच्यात कुठलाही संवाद झाला नाही असं सरकार मधील सुत्रांच म्हणणे आहे.