ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सायंकाळी 5 वाजता व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे ही बैठक होईल. पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
गलवानच्या खोऱ्यात 15 आणि 16 जूनला भारत-चीनच्या सैनिकांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचे रुपांतर हिंचारात झाले. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले असून, काही जण जखमी आहेत. त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. हा वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये बैठका आणि चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही सर्वपक्षीय बैठकीपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्यासह अन्य विरोधी पक्षांच्या अध्यक्षांशी यासंदर्भात चर्चा केली आहे.









