ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात सीमावादावरून सोमवारी रात्री आणि मंगळवारी चिनी सैन्याने लोखंडी सळई, काटेरी तारेचा वेढा असलेल्या काठ्या आणि दगडाने भारतीय जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तर काही जवान जखमी झाले आहेत. त्यामधील 4 जवान गंभीर जखमी आहेत.
या संघर्षात शहीद झालेल्या 20 जवानांची नावे जाहीर झाली आहेत.
कर्नल संतोष बाबू (हैदराबाद), मंनदिप सिंग (पटियाला), नंदिराम सोरेन (मयूरभंज), सतनाम सिंग (गुरुदासपूर), के. पालानी (मदुराई), सुनील कुमार (पटना), बिपुल राय (मेरठ), दीपक कुमार (रेवा), राजेश औरंग (बिरघम), कुंदनकुमार ओझा (साहीबगंज), गणेश राम (कांकेर), चंद्रकांता प्रधान (कंधलमाल), अंकुश (हमीरपूर), गुरूबिंदर (संगरूर), गुरुतेज सिंग (मानसा), चंदन कुमार (भोजपूर), कुंदन कुमार (साहरसा), अमन कुमार (समस्तीपूर), जय किशोर सिंग (वैशाली) आणि गणेश हंसदा (पूर्व सिंगभूम) अशी शहिदांची नावे आहेत.









