ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत-चीनमधील तणावावर तोडगा काढण्यासाठी आज दौलत बेग ओल्डी या ठिकाणी मेजर जनरल स्तरावर बैठक होणार आहे. एका वृत्तसंस्थेने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात ट्विट केले आहे.
पूर्व लडाखमधील हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीनमधील तणाव आणखी वाढला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी कमांडर स्तरावर काही बैठका झाल्या. त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. चीनने काही ठिकाणांहून सैन्य मागे घेतले. मात्र, अजूनही काही भागात चिनी सैन्य शस्त्रास्त्रांसह सज्ज आहे. त्यामुळे भारतानेही युद्धसज्जता ठेवली आहे.
चीनच्या आडमुठेपणाच्या धोरणाने दोन्ही देशातील तणाव कमी झालेला नाही. चीनने वेळीच सैन्य मागे घेतले असते तर तणाव कमी होण्यास मदत झाली असती.









