वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात भारत व इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार असून कोव्हिड 19 च्या ब्रेकनंतर भारतात होणारी ही पहिलीच क्रिकेट मालिका असेल. चार महिन्यांच्या या दीर्घ दौऱयात इंग्लंड संघ कसोटीशिवाय पाच टी-20, 3 वनडे सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
पूर्ण दौरा ः 5 फेब्रुवारी ते 28 मार्च ः चार कसोटींची मालिका 5 फेब्रुवारीपासून चेन्नईतील सामन्याने सुरू होईल आणि 28 मार्च रोजी पुणे येथील तिसऱया वनडे सामन्याने दौऱयाची सांगता होईल. चेन्नई, अहमदाबाद व पुणे या तीनच केंद्रावर या दौऱयातील सामने खेळविण्यात येणार आहेत. तिसरी कसोटी डे-नाईट असून ती अहमदाबादमध्ये खेळविली जाणार आहे.
कसोटी तारीख केंद्र वेळ
पहिली 5-9 फेब्रु. चेन्नई स.9.30 पासून
दुसरी 13-17 फेब्रु. चेन्नई स.9.30 पासून
तिसरी (डे-नाईट) 24-28 फेब्रु. अहमदाबाद दु.2.30 पासून
चौथी 4-8 मार्च अहमदाबाद स.9.30 पासून
टी-20 मालिका
पहिला सामना 12 मार्च अहमदाबाद सायं. 7 पासून
दुसरा सामना 14 मार्च अहमदाबाद सायं. 7 पासून
तिसरा सामना 16 मार्च अहमदाबाद सायं. 7 पासून
चौथा सामना 18 मार्च अहमदाबाद सायं. 7 पासून
पाचवा सामना 20 मार्च अहमदाबाद सायं. 7 पासून
वनडे मालिका
पहिला सामना 23 मार्च पुणे दु. 1.30 पासून
दुसरा सामना 26 मार्च पुणे दु. 1.30 पासून
तिसरा सामना 28 मार्च पुणे दु. 1.30 पासून.
.









