राखीव खेळाडूंना आजमावण्याची संधी
वृत्तसंस्था/ डब्लिन
भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज बुधवारी होणार असून यावेळी आरामात मालिकेत ‘क्लीन स्वीप’ साध्य करणे हे भारताचे लक्ष्य असेल. त्याचबरोबर कर्णधार जसप्रीत बुमराहला संघाची राखीव ताकद तपासण्याच्या बाबतीत संतुलन राखावे लागेल कारण बुधवारी येथे
मालिकेत बुमराह दोन सामन्यांमध्ये आठ षटके टाकताना आरामदायक स्थितीत दिसलेला आहे. परंतु पाच दिवसांत सलग तिसरा सामना टी20 खेळायचा असल्यास त्याला विचारांती निर्णय घ्यावा लागेल. अर्थात बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा जितकी जास्त गोलंदाजी करतील तितकी ते तंदुरुस्त होतील, लय चांगली मिळेल आणि त्यांच्या चेंडूंचा वेग अधिक राहील. आगामी आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने विचार करता हे आवश्यक आहे.

तथापि, कर्णधारासह हंगामी मुख्य प्रशिक्षक सितांशू कोटक यांना हे देखील लक्षात ठेवावे लागेल की, संघाला आशियाई खेळांत सहभागी व्हावे लागणार आहे आणि राखीव खेळाडूंपैकी काही खेळाडू कदाचित कमी खेळलेले असतील. त्यादृष्टीने विचार करता निकालाच्या दृष्टीने फारसे महत्त्व नसलेला हा तिसरा टी20 सामना म्हणजे आवेश खान, जितेश शर्मा, शाहबाज अहमद यासारख्या खेळाडूंना पडताळून पाहण्याची उत्तम संधी आहे. त्यांना अद्याप मालिकेत खेळता आलेले नाही.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान संघासोबत राहिलेल्या आवेशला सलग सात सामन्यांत बसवून ठेवले गेले आहे. जर त्याला पुन्हा बाजूला ठेवण्यात आले, तर कोणताही सामना खेळायला न मिळता आशियाई खेळांत उतरावे लागेल. हे त्याच्यासाठी व संघासाठी हानिकारक ठरू शकते. संघ व्यवस्थापन संजू सॅमसनला विश्रांती देण्याचा आणि आशियाई खेळांपूर्वी जितेशला आजमावण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे, अर्शदीप सिंगला कामगिरी संमिश्र राहिलेली आहे आणि गेल्या सात टी20 सामन्यांमध्ये शेवटच्या षटकांत यॉर्कर्स टाकताना सातत्य दाखवण्यात तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे आवेश किंवा मुकेश कुमारला तिसऱ्या सामन्यात वापरून पाहता येईल.
रिंकू सिंगने दुसऱ्या सामन्यात 21 चेंडूंत 38 धावा काढून आंतरराष्ट्रीय स्तरावर दणक्यात आगमन केले असून त्यामुळे भारताच्या ‘टी20’ संघाला सूर्यकुमार यादवनंतर दुसरा फिनिशर मिळाल्यासारखे दिसते. रिंकू, यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंना आपली कर्तबगारी दाखवून देण्याची ही आणखी एक संधी असेल.
संघ : भारत: जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
आयर्लंड: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्य्रू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकोम, बेन व्हाइट, क्रेग यंग .
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.
थेट प्रक्षेपण : जिओ सिनेमा, स्पोर्ट्स 18









