प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीच्या समुद्रकिनारी उभारण्यात आलेला भारती शिपयार्ड हा जहाज निर्मिती कारखाना गेली अनेक वर्षे बंद आहे. हा कारखाना सुरू
व्हावा म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न केले होते. कारखाना येओमॅन शिपयार्ड या कंपनीने आपल्या ताब्यात घेतला असून आता यापुढे याच नावाने कामकाज सुरू
राहणार आहे. नव्या स्वरूपातील कारखान्यात नव्याने 40 लोकांची भरती करण्यात आली असून कामकाजाला 50 दिवस पूर्ण झाले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. अनेक वर्षे रत्नागिरीच्या नजीक असलेल्या मिऱ्या गावामध्ये भारती शिपयार्ड या नावाने जहाज बांधणी कारखाना सुऊ होता. देशात व परदेशातील अनेक ठिकाणांहून आलेल्या मागण्यांची पूर्तता ही कंपनी करत असे. काही अडचणींमुळे हा कारखाना बंद पडला. शेकडो लोक त्यामुळे बेरोजगार झाले. हा कारखाना पुन्हा सुऊ व्हावा म्हणून अनेकांचे प्रयत्न सुऊ होते. तथापी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन कारखान्याचे काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले. त्याला यश आले.