ऑनलाईन टीम / टोकियो :
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रविवारी 1-7 असा पराभव झाल्यानंतर आज भारतीय हॉकी संघाने पूल एच्या सामन्यात स्पेनचा 3-0 ने पराभव केला. सिमरनजीत सिंह आणि रुपिंदर पाल सिंहने केलेल्या गोल्समुळे भारताने विजय मिळवला. या विजयामुळे भारताची उपांत्यफेरी गाठण्याची शक्यता बळकट झाली आहे. दरम्यान, भारताचा पुढील सामना अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे.









