नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरातील स्थानिक सुरक्षदलाच्या (टेरिटोरियल आर्मी) सदस्याचे पाकिस्तानकडून अपहरण झाल्याचे वृत्त आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा सुरक्षा रक्षक सेवेवर नव्ह्ता. त्याचे नाव शकीर मंझूर असे आहे. रांभामा येथे त्याची कार आडवून दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले असे सांगण्यात येत आहे. त्याची कार जाळण्यात आली. कुलगाम विभागात ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा तीन घटना घडल्या आहेत. मात्र, नंतर अपहरण झालेल्यांची नंतर सुटका करण्यात आली आहे.









