वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणजेच जादव पायंग यांची प्रेरणादायक कथा आता अमेरिकेच्या एका शाळेच्या अभ्यासक्रमात सामील झाली आहे. आसामचे रहिवासी असलेले 57 वर्षीय जादव पायंग शेतकरी असून त्यांनी अथक परिश्रम आणि ध्यासाच्या बळावर एकटय़ाने 550 एकर ओसाड जमिनीवर जंगल विकसित केले आहे. ब्रिस्टल क्नॅक्टिकल येथील ग्रीन हिल्स शाळेत विद्यार्थ्यांना पद्मश्री जादव यांच्या विषयी पर्यावरणाच्या धडय़ात शिकायला मिळणार आहे.
पूर्व आसामच्या माजुली बेटाच्या पर्यावरणीय स्थितीत झालेल्या घसरणीने चिंतित पायंग यांनी ओसाड जमिनीवर वृक्षारोपण सुरू केले होते. त्यांच्या प्रयत्नाने ती ओसाड जमीन आता जंगलात रुपांतरित झाली आहे. या जंगलात आता हत्ती, हरिण, गेंडे, वाघासह अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे.









