ऑनलाईन टीम / व्क्टो रिया विक्टोरिया
भारतातील कोरोनाचे वाढते संक्रमण आणि
विस्तारा एअरलाईन्सच्या विमानातून आलेले 50 प्रवाशी कोरोनाबाधित आढळून आल्याने हॉंगकॉंगने भारतातून येणाऱ्या विमानांना उद्यापासून (दि.20) 3 मे पर्यंत स्थगिती दिली आहे. हॉंगकॉंग सरकारने पाकिस्तान आणि फिलिपाईन्स येथून येणाऱ्या विमानांनाही याच काळात स्थगिती दिली आहे.
या महिन्यात विस्तारा एअरलाईन्सच्या दोन विमानांमधील 50 प्रवाशांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. त्यानंतर हाँगकाँग सरकारने सर्व प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. त्यानंतरही मुंबईहून आलेल्या विमानात 3 बाधित रुग्ण आढळल्यानंतर हॉंगकॉंग सरकारने भारतीय विमानांना 3 मे पर्यंत स्थगिती दिली आहे.