नवी दिल्ली
चिनी उत्पादकांना टक्कर देणारी भारतीय उत्पादनेच जास्तीतजास्त खरेदी केली जावीत यासाठीचे अभियान बुधवारपासून कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (केट) सुरू केले. चिनी मालावर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेचा भाग हे नवे अभियान आहे. ‘भारतीय वस्तू-आपला अभिमान’ या घोषवाक्यासह मोहिमेचा शुभारंभ केला. भविष्यात भारतातच उत्पादनांच्या निर्मितीवर जोर दिला जाणार असून 1 लाख कोटीपर्यंतच्या चिनी उत्पादनांची आयात कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
याअंतर्गत सुरुवातीला केटने चेहऱयाचे मास्क, चहाचे ग्लास रेल्वेला सुपूर्द केले आहेत. चिनी उत्पादनांना पर्यायी ठरणाऱया भारतीय उत्पादनांच्या उत्पादन-विक्रीवर जोर दिला जाणार आहे.









