ऑनलाईन टीम / टोरंटो :
कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल केले असून, भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी संरक्षण खाते भारतीय वंशाच्याच हरजीत सज्जन यांच्याकडे होते. मात्र, सज्जन यांना लष्करातील व्याभिचाराचे प्रकरण हाताळण्यास अपयश आल्याने सज्जन यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली..
अनिता आनंद यांचे वडिल एस. व्ही. आनंद तामिळनाडूचे तर आई सरोज या मूळच्या पंजाब येथील आहेत. दोघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. अनिता यांचा जन्म 1967 मध्ये स्कोटियामध्ये झाला. टोरंटो विद्यापीठात कायदा विषयाच्या प्राध्यापिका म्हणून काम केले आहे. टोरंटोजवळील ओकव्हिलेमधून 2019 रोजी खासदारकीसाठी निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांना सार्वजनिक सेवा संबंधीच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली.