ऑनलाईन टीम / सिंगापूर :
भारतीय वंशाचे प्रीतम सिंह यांची सिंगापूर संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. सभापती इंद्राणी राजा यांनी अधिकृतरित्या सिंह यांच्या निवडीची घोषणा केली. अशा प्रकारची निवड झालेले हे पहिलेच भारतीय आहेत.
सिंगापूरमध्ये 10 जुलैला संसदेच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. त्यामध्ये प्रीतम सिंह यांच्या वर्कर्स पार्टीला 93 पैकी 10 जागा मिळाल्या. तर संसदेत पीपल्स ॲक्शन पार्टीला बहुमत मिळाले. त्यांना 80 हून जास्त जागा मिळाल्या.
सोमवारी संसदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर सभापती इंद्राणी राजा यांच्याकडून प्रीतम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सिंह यांना त्यांची जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडता यावी, यासाठी आवश्यक तो निधी आणि कर्मचारी वर्गही दिला जाईल, असेही इंद्राणी राजा यांनी म्हटले आहे.









