ऑनलाईन टीम/तरुण भारत
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीदरम्यान ब्रिटनमध्ये त्यांनी लॉकडाऊन लागू केला. मात्र या लॉकडाऊनदरम्यान खुद्द पंतप्रधान जॉन्सन यांनीच पंतप्रधान कार्यालय डाउनिंग स्ट्रीट येथे ड्रिंक पार्टीचे आयोजन केले होते. या मुद्द्यावरून ब्रिटनमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढत आहे. विरोधी पक्षांकडून बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे अशी मागणी करत आहेत. अशातच ब्रिटनमधील आघाडीची सट्टा कंपनी बेटफेअर ने दावा केला की, अडचणीत सापडलेले बोरिस जॉन्सन लवकरचं पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक बसू शकतात.
‘बेटफेअर’ने दिलेल्या माहितीनुसार मे २०२० मध्ये करोना लॉकडाउनच्या कालावधीत पंतप्रधान कार्यालयातील डाउनिंग स्ट्रीटमध्ये झालेल्या ड्रिंक पार्टीसंदर्भात समोर आल्लेल्या माहितीनंतर बोरिस जॉन्सन अडचणीत आलेत. ५७ वर्षीय बोरिस जॉन्सन यांना विरोधी पक्षाबरोबरच स्वपक्षीय नेत्यांकडूनही विरोध केला जातोय, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना पंतप्रधान केलं जाऊ शकतं अशा चर्चा ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात.