ग्लोबल टाईम्सकडून दुष्प्रचार सुरू
कोरोना लसीसंबंधी जगभरात अविश्वासाला तोंड देणारा चीन आता प्रसारमाध्यमांद्वारे भारतीय लसीच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहे. याचबरोबर सुमारे 135 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतीय बाजारपेठेत चिनी लसीला स्थान न मिळाल्याने ग्लोबल टाईम्सला चांगलेचे झोंबले आहे. भारतीय नेत्यांकडून चीनविरोधी भावनांना चिथावणी आणि स्वदेशी लसीमुळे चीनच्या लसीची खरेदीची शक्यता मावळल्याचे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. भारताने लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचणीतच त्याच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. लस यशस्वी ठरल्यास भारतातील खराब वैद्यकीय सुविधांमुळे त्याचे लसीकरण करण्यास अडचणी येणार असल्याचे म्हटले गेले आहे.