ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिह्यात सोमवारी भारतीय लष्कराचं ‘चीता’ हे हेलिकॉप्टर कोसळलं.
मिळालेल्या माहितीनुसार. सकाळी साधारण 11 च्या आसपास ही दुर्घटना घडली. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिह्यातील माहोर येथे ही दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत.
उधमपूर येथून या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. ज्यानंतर ही दुर्घटना घडली. याप्रकरणी लष्कराकडून चौकशी केली जात आहे.









