ऑनलाईन टीम / बीजिंग :
भारताच्या ‘मिशन मंगळ’नंतर आता चीनने लक्ष मंगळ ग्रहाकडे वेधले आहे. मंगळ ग्रहाची रहस्य आणि तेथील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी बीजिंग ने गुरुवारी ‘ रोवर मिशन टू मार्स’ च्या अंतर्गत आपले ‘तिआनवेन 1 रॉकेट’ लॉन्च केले.
मिळालेल्या माहितीनुसार चीनने 2022 पर्यंत स्पेस स्टेशन बनवण्याचे लक्ष्य ठरवले आहे. त्यांचे हे मिशन अवकाश तंत्रज्ञानातील एक मैलाचा दगड ठरू शकते. या मिशनमुळे चीनचा या गटात समावेश होईल ज्यामध्ये अमेरिका, युरोप, रशिया, भारत आणि यूएई चा समावेश आहे.
या मिशनमध्ये एका सहा पायाच्या रोबोटच्या सहायाने मंगळाच्या पृष्ठभागावर उतरुन मातीची तपासणी केली जाणार आहे. याला हैनियानच्या सहाय्याने लॉन्च केले गेले. तिआनवेन या शब्दाचा अर्थ ‘स्वर्गाला प्रश्न विचारणे’ असा आहे. हा फेब्रुवारीपर्यंत मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचेल.