वृत्तसंस्था/ डय़ुसेलडॉर्फ
सध्या जर्मनीच्या दौऱयावर असलेल्या भारताच्या राष्ट्रीय महिला हॉकी संघाला दुसऱया सामन्यातही यजमान जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला. या दौऱयातील भारतीय महिला हॉकी संघाचा दुसरा पराभव आहे.
भारत आणि जर्मन महिला हॉकी संघामध्ये येथे चार सामन्यांची मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात जर्मनीने भारताचा 5-0 असा दणदणीत पराभव केला होता. रविवारी झालेल्या दुसऱया सामन्यात जर्मनीने भारतावर 1-0 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. या सामन्यात जर्मनीतर्फे एकमेव निर्णायक गोल 24 व्या मिनिटाला ऍमेली वर्टमनने नोंदविला. या मालिकेत आता जर्मनीने भारतावर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. मंगळवारी पुढील सामना होणार आहे.









