सँटीगो : सध्या चिलीच्या दौऱयावर गेलेल्या भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने चिलीच्या वरिष्ठ महिला हॉकी संघाला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात भारताने चिलीवर 3-2 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला.
चिलीच्या दौऱयावर भारतीय कनिष्ठ महिला संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. चालू आठवडय़ाच्या प्रारंभी भारतीय कनिष्ठ हॉकी महिला संघाने चिलीच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाचा दोन सामन्यात पराभव केला होता. बुधवारच्या सामन्यात भारतीय संघातर्फे दीपिकाने 39 व्या मिनिटाला, संगीता कुमारीने 45 व्या मिनिटाला आणि लालरिन्डिकीने 47 व्या मिनिटाला असे गोल नोंदविले.









