वृत्तसंस्था/ ढाका
19 वर्षांखालील वयोगटाच्या येथे सुरू असलेल्या सॅफ महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. रविवारी झालेल्या प्राथमिक गटातील शेवटच्या सामन्यात भारताने नेपाळचा 1-0 असा पराभव केला.
भारत आणि नेपाळ यांच्यातील रविवारी झालेल्या सामन्यात प्रियांका देवीने 66 व्या भारताचा एकमेव निर्णायक गोल नोंदविला. या स्पर्धेतील अंतिम सामना बुधवारी खेळविला जाणार आहे. बांगलादेशविरूद्ध झालेल्या या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात खेळलेल्या भारतीय संघामध्ये प्रशिक्षक ऍम्ब्रोस यांनी दोन बदल केले. नेपाळविरूद्धच्या सामन्यात त्यांनी नितू लिंडा आणि लिनेडा कॉम यांना खेळविले. भारतीय संघाने रविवारच्या सामन्यात गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या. मध्यंतरापर्यंत गोल फलक कोरा होता. दरम्यान 66 व्या मिनिटाला प्रियांका देवीने नेपाळची बचावफळी भेदत भारताचा एकमेव निर्णायक गोल केला.









