वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला फुटबॉल संघाचे नुकतेच ब्राझीलच्या दौऱयावरून मायदेशी आगमन झाले आहे. आता भारतीय महिला संघासाठी केरळमधील कोची येथे सराव शिबीर आयोजित केले आहे.
पुढील महिन्यात होणाऱया एएफसी आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल फेडरेशनने महिला फुटबॉल संघाकरिता खास प्रशिक्षण सराव शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. ब्ा्राझीलच्या दौऱयामध्ये भारतीय महिला फुटबॉल संघाने चौरंगी महिला फुटबॉल स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. बलाढय़ ब्राझील, चिली, व्हेनेझुएला या संघांबरोबर खेळण्याची संधी भारतीय संघाला मिळाली.









