वृत्तसंस्था/ कैरो
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला नेमबाज राही सरनोबत, ईशा सिंग आणि रिदम सांगवान यांनी 25 मी. सांघिक पिस्तुल नेमाबाजी प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदकासह पदक तक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे.
शनिवारी रात्री येथे झालेल्या महिलांच्या 25 मी. सांघिक नेमबाजी स्पर्धेच्या दुसऱया पात्र फेरीच्या टप्प्यात भारताच्या सरनोबत, ईशा सिंग आण सांगवान यांनी 450 पैकी 441 गुण घेत आघाडीचे स्थान पटकाविले. आता भारत आणि सिंगापूर यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल. चीन तैपेई आणि जपान यांच्यात कास्यपदकासाठी लढत होईल. भारताच्या सौरभ चौधरी आणि महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल सांघिक नेमबाजी प्रकारात भारताने सुवर्णपदके मिळविली आहेत. ईशा सिंगने महिलांच्या वैयक्तिक 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत रौप्यपदक पटकाविले आहे.









