नवी दिल्ली : आपली वाहने ऑफ रस्त्यावर धावण्यासाठी तयार करणारी कंपनी म्हणून ओळख असणारी अमेरिकेतील पोलारिस कंपनीने रस्त्यावर धावणाऱया वाहनांची निर्मिती केली आहे. स्पोर्टसमन 570 हे ट्रक्टरचे मॉडेल भारतीय बाजारात दाखल केले आहे. हेच वाहन कायदेशीरपणे रस्त्यावर धावणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. या ट्रक्टरची सुरुवातीची एक्स शोरुत किंमत 8.49 लाख रुपये आहे. परंतु सादरीकरणा दरम्यानच्या सवलतीप्रमाणे यांची खरेदी 7.99 लाख रुपयांना करण्याची संधी मिळणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. कायदेशीरपणे हे उत्पादन रस्त्यावर उतरण्यासाठी या ट्रक्टरला सादर केले असल्याचे कंपनीने सांगितले आहे. शेतीच्या कामासाठी उपयोग होण्याचा उद्देश समोर ठेऊन या ट्रक्टरची निर्मिती केली आहे. तसेचे उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्पोर्टसमन 570 हा ट्रक्टर सर्वाधिक प्रसिद्ध असल्याचा दावा कंपनीने यावेळी केला आहे. चार चाकांच्या मजबूतीवर हा ट्रक्टर शेतीची सर्वप्रकारची काम करु शकत असून जवळपास 680 किलोपर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता यामध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे.
Previous Articleडिसेंबर तिमाहीत येस बँकेला 18,564 कोटी रुपयाचा तोटा
Next Article आपटी नि उसळीचा खेळ!








