नॅशनल कॅडेट कॉर्प्स (राष्ट्रीय छात्र सेना) किंवा एनसीसी ही जगातील सर्वात मोठी गणवेशी युवक संघटना असून गेल्या दि. 22 नोव्हेंबर रोजी या संघटनेने आपला 72 वा वर्धापनदिन साजरा केला. या उत्सवाच्या काही आठवडय़ांपूर्वी केरळ उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निवाडय़ाने एनसीसीच्या कायदा तरतुदीत एक मोठा बदल करून पारंपरिकतेला एक सकारात्मक दृष्टिकोन दिला.
‘एनसीसीमध्ये प्रवेश घेण्याचा कायदेशीर हक्क लिंगभेदामुळे नाकारता येणार नाही’ अशी नोंद करत केरळ उच्च न्यायालयाने सर्व पंथियांना एक दिलासा दिला आहे. तिरुअनंतपुरममधील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱया एका तृतियपंथी विद्यार्थ्याने आपल्याला एनसीसीमधील प्रवेश नाकारल्याच्या मुद्दय़ावरून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. याचिकाकर्त्याने आपण ‘स्त्राr’ किंवा ‘पुरुष’ पैकी एक लिंग अशी ओळख प्रवेश नोंदणीपत्रात न दिल्यामुळे एनसीसी युनिटमधून तिला वगळण्यास विरोध करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. वरील याचिकेत एनसीसी अधिनियम कायदा 1948 मधील कलम 6 व भारतीय संविधानमधील परिच्छेद 14, 15 व 21 मधील कलमांचा भंग करणाऱया एनसीसीच्या प्रवेश नाकारण्याच्या मताला गैरवाजवी व बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने तृतियपंथियांना एनसीसीमधील प्रवेशाला मान्यता दिली आहे. एनसीसीकडे फक्त ‘स्त्राr’ व ‘पुरुष’ अशा दोन प्रकारच्या युनिट्स असून तृतियपंथी विद्यार्थी दोघांपैकी एका प्रकारात मोडत नसल्यामुळे अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या निर्णयात भेदभाव, गैरवाजवीपणा किंवा राज्यघटनेचे उल्लंघन ठरत नाही, असे एनसीसीचे म्हणणे न्यायालयाने ग्राहय़ धरले नाही.
औपचारिक शिक्षण प्रक्रियेत मूल्यवर्धन करण्यात एनसीसीने दिलेले योगदान नाकारले जाऊ शकत नाही, असे थोर कार्य एनसीसीकडून आजवर झालेले आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतात विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक पातळीवरील अभिवृद्धी व बहुविध विकासामध्ये एनसीसीने प्रदीर्घ व ठोस अशी भूमिका बजावली आहे. एनसीसी आज उच्चशिक्षणातील अतिरिक्त क्रियाकल्पाचा (एस्क्स्ट्रा करिक्मयुलर) भाग असून विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता, शारीरिक सामर्थ्य वाढविण्यात व मानसिक दुर्बलता घालविण्यात महत्त्वाची मदत करत आले आहे. आपल्या नियमित शिक्षणादरम्यान इतर व वेगळय़ा क्षेत्राचा अनुभव समृद्ध करण्यात आपले भावी आयुष्य आत्मविश्वासबद्ध, व्यावहारिक व शिस्तबद्ध करण्यासाठी भरपूर वाव देते. आपल्या देशातील एनसीसीची कल्पना साल 1917 मधील. तत्कालीन संरक्षण कायद्याची व्याप्ती स्पष्ट करताना सैन्य दलातील कमतरता दूर करण्याच्या उद्देशाने विद्यापीठ कॉर्प्सची (दल किंवा उपविभाग या अर्थाने) स्थापना करण्यात आली. 1920 साली देशात प्रांत कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर ‘युनिर्व्हसिटी कॉर्प्स’ची जागा ‘युनिर्व्हसिटी टेनिंग कॉर्प्स’ने घेतली. 1942 साली या विभागाचे नाव पुन्हा बदलत ‘विद्यार्थी अधिकारी प्रशिक्षण विभाग’ असे झाले व पुढे 1946 साली पं. नेहरू आणि एच. एन. कुंजरू यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. देशातील तरुणाईला भारताचे चांगले नागरिक बनविण्यासाठी प्रशिक्षण आणि प्रेरणा देणारी संस्था स्थापन करून विद्यार्थीदशेत हे शिक्षण समांतर औपचारिक शिक्षणाबरोबरच देणे हा यामागील उद्देश होता.
विद्यमान एनसीसी 16 जुलै 1948 साली एनसीसी कायदा 1948 च्या मंजुरीनंतर संरक्षण मंत्रालयाच्या अमलाखाली स्थापन झाली. 1949 मध्ये एनसीसीमध्ये ‘मुलींसाठी’ विभाग सुरू झाला. आधी सैन्य, मग वायु व नंतर नौदल शाखा 1950 साली जोडल्यानंतर एनसीसीला ‘त्रिसेवा’ अशी प्रतिमा प्राप्त झाली. नेहरूंच्या इच्छेनुसार त्याचवषी एनसीसीच्या अभ्यासक्रमात सामुदायिक विकास, समाजसेवा इत्यादी उपक्रमांची समाविष्टता करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या औपचारिक शिक्षणाबरोबरच त्यांना सामाजिक बांधीलकी, जबाबदारी व राष्ट्रनि÷ नागरिक बनविण्यात विद्यमान एनसीसी उपयुक्त असे कार्य करत असून संपूर्ण देशभरात हायस्कूल, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून कॅडेट भरती करते. या प्रवेशात जात-पात, धर्म किंवा स्त्राr-पुरुष असा भेद कधीच केला गेलेला नाही. साधारण 8 ते 13 वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना व 36 वय वर्षापर्यंतच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये प्रवेश दिला जातो. तरुणांमध्ये धर्मनिरपेक्षतेची भावना जागृत करण्यासाठी एनसीसीमधील तीन वर्षाच्या शिक्षण काळात व माणूस, समुदाय व निसर्ग यामधील आंतर-निर्भरता संबंध शिकविण्यावर जोर दिला जातो. युवा सशक्तीकरणात वचनबद्ध असलेल्या एनसीसीची सुरुवात अवघ्या 20 हजार कॅडेट्सपासून होऊन आज देशभरातून 14.5 लक्ष विद्यार्थीसंख्या जोडणाऱया या संघटनेचे कार्य देशातील 716 पैकी 600 जिल्हय़ांमधील 16,300 शैक्षणिक संस्थांमध्ये छात्र सेनेचे कार्य पसरले आहे. छात्र सेना प्रशिक्षण महाविद्यालयीन स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य केले जावे, या प्रकारचे मत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केले होते. वास्तविक 1953 च्या दरम्यान सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी छात्रसेना प्रशिक्षण सक्तीचे होते. 1968 साली ही सक्ती सौम्य करून छात्रसेनेमधील प्रवेश स्वेच्छा तत्त्वावर केला गेला. सक्तीच्या छात्र सेना शिक्षणाचा उपयोग भारताला 1962, 1965 व 1971 च्या युद्धादरम्यानच्या काळात झाला. साल 1965 मध्ये छात्र सेनेतील विद्यार्थी व प्रशिक्षित शिक्षकांनी आपल्या सैन्यबळाच्या युद्धातील कार्यात महत्त्वाची मदत पुरविली. आपल्या विस्तीर्ण अशा देशात मोठय़ा प्रमाणात निरपेक्ष सेवा करण्यासाठी राष्ट्रप्रेरित नागरी मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेता व प्रामुख्याने सीमा व किनारी भागात एनसीसीचे कार्य वाढविण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना गेल्या 15 ऑगस्ट 2020 च्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर मांडली आहे. सैन्य, नौदल व हवाई दल या तिन्ही प्रांतांमधील एकूण एक लक्ष अतिरिक्त छात्र सेना सामर्थ्य वाढविण्यासाठी नियोजनबद्ध कार्य सुरू आहे. यात प्रामुख्याने सीमावर्ती जिल्हे व सागरी किनारी राज्यांमधून छात्रसेनेच्या हवाई व नौदल तुकडय़ा उभारण्याचा दृढ संकल्प पंतप्रधानांनी केला आहे. मोठी विस्तार योजना व उच्च न्यायालयाने आदेशाद्वारे निश्चित केलेल्या प्रवेश मापदंडांमधील महत्त्वाचा बदल येत्या काळात अधिकाधिक तरुणांना सशस्त्र सैन्यात सामील होण्यास नक्कीच प्रवृत्त करतील. आपल्या औपचारिक शिक्षणाबरोबरीनेच विद्यार्थ्यांना निर्भेद, नि:स्वार्थी व राष्ट्रप्रेमाच्या व्रताची क्याप्ती खोलवर वाढविण्यासाठी एनसीसीची गरज तीव्रतेने भासेल.
डॉ. मनस्वी कामत








