ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध कृष्णा यांची कालच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. कृष्णा याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. राखीव खेळाडूंमध्ये कृष्णा सह अभिमन्यु ईश्र्वरन, आवेश खान आणि अर्जुन नगवासवाल यांची निवड झाली आहे.

- केकेआरच्या 4 खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग
प्रसिद्ध कृष्णा यंदा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडे होता. या टीममधील 3 जणांना यापूर्वीच कोरोनाची बाधा झाली आहे. यापूर्वी या टीममधील न्यूझीलंडचा खेळाडू टीम सिफर्ट, संदीप वॉरियर आणि वरून चक्रवर्ती यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कृष्णा हा चौथा खेळाडू ठरला आहे.









