ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकास्थित 155 भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत 22 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे अमेरिकेत 1 लाख 25 हजार नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. भारतीय उद्योग महासंघाच्या एका अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीडच्या अहवालानुसार, मूळच्या भारतीय असलेल्या कंपन्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन, डीसी आणि पोर्टो रिको यांच्यासह 50 राज्यात गुंतवणूक केली आहे. परिणामी मोठ्या संख्येने नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. 155 कंपन्यांनी अमेरिकेत 22 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
अमेरिकास्थित भारतीय कंपन्यांनी यापुढेही अमेरिकेतील औषध उत्पादन, दूरसंचार संरक्षण, वित्तीय सेवा पर्यटन, अभियांत्रिकी, वाहन उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. अमेरिकाही भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देत आहे.









