नवी दिल्ली
इंडियन टेलिव्हीजन कंपनी व्हीयू यांच्याकडून अफोर्डेबल प्रीमियम 4के सिनेमा टीव्ही सादर केली आहे. सदरचा टीव्ही 43, 50 आणि 55 इंच डिस्प्ले आकारात ही टीव्ही सादर केली आहे. टीव्हीची सुरुवातीची किंमत 26,999 रुपये आहे. 4-के रेझोल्यूशनसोबत डॉल्बी व्हीजन एचडीआर व अँड्राईड-9 पाय ऑपर्रेटिंग सिस्टम सपोर्ट असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. भारतीय बाजारात शाओमी, वनप्लस, सॅमसंग आणि एलजीसारख्या कंपन्यांच्या टीव्हीसोबत व्हीयूची टक्कर होणार आहे. व्हीयू सिनेमा आवृत्तीची विक्री 18 जानेवारीपासून ऍमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर होणार आहे. सोबत ऑफलाईन विक्रेत्यांकडे आणि स्टोअर्सवरही उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.








