वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये 44,500 इतक्या स्कोडा गाडय़ांची विक्री नोंदवली गेली असून ती भारतीयांची तिसरी लोकप्रिय गाडी ठरली आहे. स्कोडा ऑटो वर्षाची अखेर दमदार विक्रीच्या माध्यमातून करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या काळात 44,500 गाडय़ांची विक्री करण्यात आली असून ती 50,000 वर नेण्याचा इरादा कंपनीचा आहे. 2023 मध्ये 60,000 चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहने जास्तीत जास्त आणण्याचा स्कोडा ऑटोचा इरादा आहे. लवकरच 5 नव्या सुव गटातील गाडय़ा बाजारात उतरविल्या जाणार आहेत. या वरील यशस्वी कामगिरीसाठी कंपनीने मेड इन इंडिया या मोहिमेला श्रेय दिले आहे. यातील पाच स्टार रेटींग असलेली कुशाक 2021 मध्ये लाँच करण्यात आली होती. यावर्षीच्या प्रारंभी स्लाविया ही गाडी सादर करण्यात आली.









