दुसऱया तिमाहीत सेवा शक्य : रिलायन्सची क्वॉलकॉमसोबत भागीदारी, 1 जीबीपीएस इंटरनेटचा वेग
वृत्तसंस्था/ मुंबई
मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार रिलायन्स जिओ 5जीसाठी क्वॉलकॉमसोबत भागीदारी करत आहे. या भागीदारीच्या माध्यमातून 5 जी नेटवर्कची चाचणी सध्याला केली जात असल्याचे समजते. त्यामुळे नव्या वर्षामध्ये भारतीयांना 5 जी नेटवर्क सेवेचा लाभ गिफ्ट रूपात रिलायन्सकडून भारतीयांना मिळेल अशी शक्मयता अधिक गडद होताना दिसते आहे.
4 जीच्या आगमनानंतर कुठे भारतात इंटरनेटचा वेग खूप वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे मध्यंतरीच्या काळात मात्र नेटवर्क तुटल्यामुळे अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागले होते. 4 जी सेवेची 100 एमबीपीएसची क्षमता मात्र टेलिकॉम कंपन्यांकडून पूर्ण करण्यात आली नाही. 4 जी डिजिटल प्रयोगांमध्ये खूप सारे प्रयत्न करण्यात आले. पण आता 5 जी सेवा येणार असल्याने इंटरनेटचा वेग दुप्पटीने वाढताना दिसणार आहे. डिजिटलीकरणाच्या वेगाच्या माध्यमातून अनेकांचे व्यवहार अधिक जलद होताना दिसणार आहेत.
रिलायन्स जिओ यांनी दुसऱया तिमाहीमध्ये 5 जी सेवा लॉन्च करण्याचे निश्चित केले आहे. यादृष्टीने कंपनीच्या तयारीला आता वेग येऊ लागला आहे. रिलायन्स जिओ 5 जी सेवेसाठी कंपनीने क्वॉलकॉमसोबत भागीदारी केली आहे. 5 जीची चाचणी सध्या सुरू असून भारतामध्ये ही सेवा लवकरच ग्राहकांना उपलब्ध केली जाणार आहे. 5जी सेवा आल्यानंतर 1 जीबीपीएस इतका वेग इंटरनेटचा असेल असेही सांगितले जात आहे. अशाने इंटरनेटचा कमी होणारा वेग आणि कॉल ड्रॉप सारख्या भेडसावणाऱया समस्या पुढील काळामध्ये संपुष्टात येणार आहेत.
कोरोनाच्या काळामध्ये अनेकांवर वर्क
फ्रॉम होम करणे भाग पडले होते. त्या काळात घरातच अनेकजणांनी ठिय्या मांडल्याने मोबाईल, लॅपटॉपचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. नव्या वर्षातही वर्क फ्रॉम होमला लोक प्राधान्य देतील. त्यामुळे त्यांना 5जी सेवेचा खूप लाभ होणार आहे. 5 जी सेवा आल्यानंतर उपचार, रेल्वे, शिक्षण, बँकिंग आणि रोबोटिकसारख्या क्षेत्रांना या सेवेचा जास्त लाभ होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.









