ऑनलाईन टीम / बीजिंग :
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात सीमावादावरून भारत आणि चिनी सैन्यांत संघर्ष झाला. मात्र, आता चीनला भारतासोबत सीमेवर कोणताही संघर्ष नको असे, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी म्हटले आहे.
झाओ लिजियन म्हणाले, गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक मारले गेले. लडाखमधील सीमावाद चर्चेतून सोडविण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न सुरू आहे. असे असतानाच भारतीय सैनिक सीमा ओलांडून चीनच्या हद्दीत घुसले आणि खिळे, काटेरी तारा गुंडाळलेल्या काठ्या आणि दगडांनी चिनी सैन्यावर हल्ला केला. यामुळे दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये तणाव आणखी वाढला यात दोन्ही देशांचे नुकसान झाले.
चीनला यापुढे भारतासोबत कोणताही संघर्ष करायचा नाही. त्यामुळे भारताने आपल्या सैनिकांना सीमा ओलांडण्यापासून रोखावे. भारतीय जवानांनी कोणतीही चिथावणीखोर कृती करु नये, तसेच सीमेवरील परिस्थिती बिघडवू नये असे झाओ लिजियन यांनी म्हटले आहे.