वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिच रेटिंग्स या रेटिंग्स संस्थेने चालू आर्थिक(2021-22) वर्षासाठी भारताचा आर्थिक वृद्धीदराचा अंदाज घटवून तो 8.7 टक्के केला आहे. त्यांनी या अगोदर जूनमध्ये हा वृद्धीदर 10 टक्क्यांच्या पुढे राहणार असल्याचे भाकीत केले होते.
रेटिंग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार कोविड महामारीच्या दुसऱया लाटेमुळे आर्थिक स्थिती रुळावर येण्यासाठी काहीसा उशिर झाला आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर अद्यापही अर्थव्यवस्था म्हणावी तशी सकारात्मक राहिलेली नाही. त्यामुळेच एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊनच कंपनीने नवा घटवलेला अंदाज व्यक्त केला आहे.









