नवी दिल्ली / प्रतिनिधी
प्रक्षोभक आणि बर्याचदा विवादास्पद विधानांसाठी ओळखली जाणारी कंगना राणावत, बुधवारी संध्याकाळी एका कार्यक्रमात भारताला 1947 साली भिक मिळाली आपल्याला खरे स्वातंत्र्य २०१४साली मिळाल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं असुन तिच्या विधानांबद्दल सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असुन कंगना राणावत पुन्हा एकदा वादाचे आणि संतापाचे केंद्र बनली आहे
कंगना म्हणाली की तिचा राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही पण एक कलाकार म्हणून आणि राष्ट्रवादी म्हणून ती खूप जागरूक आहे. सावरकर देशभक्त नसल्याच्या काँग्रेसच्या आरोपाविषयी बोलताना कंगना म्हणाली, “हा खूप मोठा विषय आहे. मी खूप अभ्यास केला आहे आणि एक चित्रपटदेखिल केला आहे.तसेच 1947 साली देशाला स्वातंत्र्याच्या नावाने भिक मिळाली असुन खरे स्वातंत्र्य 2014 साली मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यावर मिळाले.कंगनाच्या विधानांबद्दल सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असुन सर्व स्थरातून या विधानाचा निषेध केला जात आहे.









