ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशिया पुढील वर्षी भारताला जमिनीवरून हवेत मारा करणारी एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली देणार आहे. त्यासाठी रशिया कठोर मेहनत घेत असल्याचे रशियाच्या या मिशनचे उपप्रमुख रोमन बबुशिकन यांनी सांगितले.
बबुशिकन म्हणाले, रशिया एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली खेप 2021 च्या वर्षाअखेरीस भारताच्या हवाली करणार आहे. भारताने ऑक्टोबर 2018 मध्ये 5 एस-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी रशियाशी 5 अब्ज डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली होती.
तसेच भारत-रशिया संयुक्तपणे भारतीय सैन्यासाठी 200 कामोव केए-226 टी युद्ध हेलीकॉप्टरचेही उत्पादन करणार आहे. भारत आणि रशियाचे संबंध कोणत्याही निर्बंध आणि परदेशी हस्तक्षेपाच्या पलिकडचे असल्याचेही बबुशिकन यांनी म्हटले आहे.