ऑनलाईन टीम / काठमांडू :
नेपाळ संसदेकडून भारताकडून तीन भाग आपल्या हद्दीत असल्याचे दाखवणाऱ्या वादग्रस्त नकाशाला गुरुवारी मंजुरी देण्यात आली. नेपाळच्या नेशनल असेंब्लीने नकशाबाबतचे संविधान संशोधन विधेयक मंजूर केले.
नेपाळने मंजूर केलेल्या नव्या नकाशाच्या बाजूने 57 मंते पडली. तर विरोधात कोणीही मतदान केले नाही. यामुळे हे विधेयक नेशनल असेंब्लीमध्ये एक मताने पारित झाले.
नवीन नकाशात नेपाळने लिपूलेख, कालापानी आणि लिंप्युधाराला आपले क्षेत्र म्हणून सांगितले आहे. तसेच नेपाळने नकाशात बदल केला असून भारताचा तब्बल 395 चौकिमी भाग आपल्या हद्दीत समाविष्ट केला आहे. मात्र, भारताने या कृतीवर आक्षेप घेतला असून या नकाशास मंजुरी देण्यास नकार दिला आहे. हा नकाशा केवळ एखाद्या राजकीय हत्यारासारखा असून त्याचा कुठलाही आधार नाही असे भारताने म्हटले आहे.
नेशनल असेंब्लीमध्ये पारीत झालेले हे विधेयक राष्ट्रपती विद्यावेदी भंडारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. त्यावर राष्ट्रपतींची सही झाल्यावर या नकाशाचा समावेश महत्त्वपूर्ण कागदामध्ये केला जाईल.