वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाईम्स गुपअंतर्गत येणाऱया डिजिटल व्यवसायात करणाऱया टाइम्स इंटरनेटची कमाई 2019-20 मध्ये 24 टक्क्मयांनी वधारुन 1625 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीचा वार्षिक अहवाल सादर झाला असून यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीच्या काही उत्पादनांनी चांगली कामगिरी केली आहे. टाइम्स इंटरनेटच्या ग्राहकांची संख्या 23 टक्क्मयांनी वाढली आहे.
यासोबतच नियमित ऍक्टिव्ह ग्राहकांची संख्या वाढून 11.1 कोटींच्या घरात पोहोचली आहे. तसेच महिन्याच्या पातळीवर हा आकडा 44 टक्क्मयांनी वधारुन 6700 कोटींवर राहिला आहे. सदरच्या आकडेवारीच्या आधारे टाइम्स नेटवर्क हा देशातील सर्वात मोठा डिजिटल नेटवर्क असल्याचे कंपनीने म्हटले आहे. येत्या 2025 पर्यंत 1 अब्ज डॉलरच्या कमाईसोबत 1 अब्ज भारतीयांजवळ आमचे नेटवर्क पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे टाइम्स इंटरनेटचे उपाध्यक्ष सत्यन गजवानी यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.









