ऑनलाईन टीम / लडाख :
भारत-चीनमध्ये सीमावादावरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी रशियातील मॉस्कोमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये गुरुवारी सकारात्मक बैठक झाली. मात्र, चीन दगाबाज असल्याने भारताने सीमारेषेवर 155 मिमी होवित्झर तोफा तैनात केल्या आहेत.
चिनी लष्कराने पॅन्गाँग सरोवराजवळ आपली ताकद वाढवल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय लष्कराने सीमारेषेवर 155 मिमी होवित्झर तोफा तैनात केल्या आहेत.
चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 50 हजार सैन्य तैनात केले आहे. तसेच जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र, रॉकेट आणि 150 लढाऊ विमाने तैनात केली आहेत. मात्र, प्रत्यक्षात चीन कोणत्याही सशस्त्र कारवाईसाठी तयार नसेल. चीन केवळ आपली ताकद दाखवण्यासाठी या हालचाली करत असल्याचे सांगण्यात येते. भारताने मात्र चीनवर विश्वास न ठेवता युद्धसज्जता ठेवली आहे.