ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबान विरोधकांना भारताने आश्रय देऊ नये, अन्यथा मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा अफगाणी नेते गुलबुद्दीन हेकमत्यार यांनी दिला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हेकमत्यार म्हणाले, भारताने तालिबान विरोधकांपासून दूर रहावे. त्यांना आश्रय देण्याचा प्रयत्न करू नये, तसे झाल्यास ते तालिबानी सरकारविरोधात व्यासपीठ निर्माण केल्यासारखे होईल. काश्मीर प्रश्नी आम्हाला रस नाही. त्यामुळे भारताने भीती बाळगू नये. उलट भारताने आता अफगाणिस्तानबद्दल सकारात्मक भूमिका घ्यावी. विदेशी राजवटींचे समर्थन करू नये. अफगाणिस्तानवर सत्ता मिळवण्यात दोन देश अपयशी ठरले आहेत. या अपयशाचा भारताने पुनर्विचार करावा, असेही हेकमत्यार म्हणाले.