ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 81 लाख 84 हजार 083 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 74 लाख 91 हजार 513 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
मागील 24 तासात देशात 46 हजार 964 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 470 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 5 लाख 70 हजार 458 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशात 1 लाख 22 हजार 111 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
देशात आतापर्यंत 10 कोटी 98 लाख 87 हजार 303 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 91 हजार 239 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.31) करण्यात आल्या.









