ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 60 लाख 74 हजार 703 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 50 लाख 16 हजार 521 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मागील 24 तासात देशात 82 हजार 170 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1039 रुग्णांचा मृत्यू झाला. 60.74 लाख रुग्णसंख्येपैकी सध्या 9 लाख 62 हजार 640 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशात 95 हजार 542 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
देशात आतापर्यंत 7 कोटी 19 लाख 67 हजार 230 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 7 लाख 09 हजार 394 कोरोना चाचण्या रविवारी एका दिवसात करण्यात आल्या.









