ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 44 हजार 489 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 92 लाख 66 हजार 706 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 35 हजार 223 एवढी आहे.

बुधवारी दिवसभरात 36, 367 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशात 04 लाख 52 हजार 344 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 86 लाख 79 हजार 138 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत देशात 13 कोटी 59 लाख 31 हजार 545 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 90 हजार 238 कोरोना चाचण्या बुधवारी (दि.25) एका दिवसात करण्यात आल्या.









