प्रतिनिधी / बेळगाव
16 जूनपासून भारत सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असणे जरुरीचे केले आहे. या नवीन कायद्याचे जॉयअल्लुकास स्वागत करीत आहे. भारतीय ग्राहक सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतो. या नवीन कायद्यामुळे आपली गुंतवणूक अधिक सुरक्षित झाली आहे. आणि सोन्याच्या बाजारपेठेत पारदर्शकता आणली जाणार आहे. अगदी सुरुवातीपासून जॉयअल्लुकासमध्ये ग्राहकांना बीआयएस 916 हॉकमार्क असलेले दागिनेच मिळतात. आपल्या उत्कृष्ट कारागिरांकडून घडवून घेतलेल्या दागिन्यांच्या दर्जावर ‘जॉयने’ कधीच तडजोड केली नाही. या नवीन पॉलिसीनुसार ग्राहक आत्मविश्वासाने सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतील. यामध्ये सोन्याची शुद्धता आणि दर्जा दोन्हींची खात्री मिळेल. तसेच सोने विकताना त्यांना योग्य मोल मिळेल. या पॉलिसीमुळे भारत 100 टक्के शुद्ध सोने विकणारा देश बनेल, असा विश्वास जॉय अल्लुकास यांनी व्यक्त केला आहे.









