ऑनलाईन टीम
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. यात कोविशिल्ड, कोवॅक्सिन, मॉडर्ना, स्पुटनिक व्ही आणि नुकतीच परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतीयांना दिल्या जात आहेत. यातच लसीसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर आली. लसीकरणामुळे कोरोनाची भिती काहीशी कमी होत असताना बनावट लसीमुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारत आणि युगांडामध्ये कोविशिल्डच्या बनावट लसी आढळून आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने यासंबंधी माहिती दिली आहे. याला सिरमनं देखील दुजोरा दिला आहे. WHO नं यासंदर्भातला इशारा आपल्या संकेतस्थळावर देखील दिला आहे. WHO च्या तपासणी विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
भारतामध्ये कोविशिल्ड लसीच्या २ एमएलच्या वायल्स आढळून आल्या आहेत. पण सिरम इन्स्टिट्युटकडून २ एमएलच्या वायल्स तयारच केल्या जात नाहीत. तर, दुसरीकडे युगांडामध्ये एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या कोविशिल्ड लसींची एक बॅच दिसून आली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं यासंदर्भात अधिक जागरुकपणे काळजी घेण्याचं आवाहन या देशांना केले आहे.
लस वितरणाच्या सर्व टप्प्यांवर बारीक नजर ठेवा
बनावट लसींचा धोका टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून रुग्णालये, क्लिनिक्स, आरोग्य केंद्रे, वितरक, फार्मसी आणि वितरणाच्या इतर सर्व टप्प्यांवर बारीक नजर ठेवण्याचं आवाहन केले आहे. तसेच, तुम्ही जर अशा प्रकारची लस घेतली असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं देखील आवाहनही केलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









