नवी दिल्ली
एलॉन मस्क यांच्या मालकीच्या इलेक्ट्रिक कार कंपनीकडून् भारतात वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्पेसेक्स सॅटेलाइटवर आधारीत वेगवान इंटरनेट सेवा भारतात सुरू केली जाणार आहे. कंपनी याकरीता स्टारलिंक सॅटेलाइटची मदत घेणार असल्याचे कळते. यासाठी कंपनीने प्री-बुकिंगला सुरूवात केली आहे. याने भारतीय टेलिकॉम कंपन्यांना स्पर्धा झेलावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.









