ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 60 हजार 963 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 834 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 23 लाख 29 हजार 639 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 46 हजार 091 एवढी आहे.
सध्या देशात 6 लाख 43 हजार 948 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 16 लाख 39 हजार 600 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 2 कोटी 60 लाख 15 हजार 297 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 33 हजार 449 रुग्णांची तपासणी मंगळवारी एका दिवसात करण्यात आली.









